Your Investment

for this course

Middle School
High School     

Premium Course

eLearning + Physical Books

Lifetime

Access

1 Year Guarantee

eLearning Modules - Videos, Audios, Tests, PDF ebooks

Physical Books Delivered

All Content in Pen Drive

Fundamental Course

eLearning

Lifetime

Access

1 Year Guarantee

eLearning Modules - Videos, Audios, Tests, PDF ebooks

eBooks are available

All content in Members' Area on Website

Frequently Asked Questions

1. खरोखर मी घरच्याघरी इंग्लिश बोलायला शिकेन कांं ?

उत्तर – नक्कीच. २००२ पासून शेकडो जणांनी या कोर्समध्ये दिलेल्या कॉन्सेप्ट्सचा वापर करून इंग्लिश बोलायला सुरुवात केली आहे. तुम्हीही नक्कीच इंग्लिश बोलू शकाल !


2. मला जर इंग्लिश बोलता आले नाही तर ?

उत्तर – 365 दिवसांची मनी-बॅक गॅरंटी ! मी तुम्हाला 50 - 100 दिवसाची नाही, तर 365 दिवसाची १००% 'मनी बॅक' गँरंटी देतो आहे. जर तुम्हाला वाटलं कि आपल्याला ह्रा कोर्सचा फायदा नाही झाला, तर तुम्ही फक्त मला सांगा - फोन किंवा ई-मेलने. मी तुमचे सर्व पैसे परत करेन, अर्थात - मला पूर्ण खात्री असल्यामुळेच मी ही एवढी बोल्ड गॅरंटी देतोय, म्हणून तुम्ही ह्रा कोर्समध्ये सांगितल्या प्रमाणे गोष्टी करा व इंग्लिश बोलायला सुरुवात करा.

3. मला फक्त वाचून किंवा लिहून समजत नाही. मी या आधी बरीच पुस्तके वाचली आहेत, माझं काय ?

उत्तर – हे फक्त पुस्तक नाही, तर संपूर्ण कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये व्हिडिओ, ऑडिओ, ईबुक्स, एक्सरसाईसेस दिलेल्या आहेत. या सर्वांचा वापर करून तुम्ही इंग्लिश मध्ये बोलायला शिकणार आहात.

4. पण शब्दांचं काय? मी शाळेत सुद्धा कधी पाठ केले नाहीत, तर आता काय करणार ?

उत्तर – शब्द पाठ करण्यापेक्षा माझा भर नेहमी शब्द आत्मसात करण्यावर असतो. ते आपल्याला वेळेवर आठवले पाहिजेत व समजले पाहिजेत, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. हे तुम्ही 5-6 प्रकारे करु शकतात, पाठ करणं हा त्यातलाच एक प्रकार आहे. आपल्या कोर्समध्ये जे 1897 शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने आत्मसात करणार आहात – ऐकून. ह्रा सर्व शब्दांचा उच्चार मी करुन दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही काही वेळा हे शब्द फक्त ऐकले, तरीही ते तुम्हाला समजतील व तुम्ही त्यांचा वापर सुद्धा करु शकाल.

5. पण मला ग्रामर आवडत नाही,समजत नाही व जमतही नाही, तरी मी ह्रा कोर्सने मी बोलू शकेन कां ?

उत्तर – हो, कारण ह्रा कोर्स मध्ये इंग्लिश बोलण्यासाठी ग्रामर मधल्या जेवढया टॉपिक्सची आवश्यक्ता आहे, फक्त तेवढेच टॉपिक्स घेतले आहेत व तेही अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी कि तुम्हाला इंग्रजी ग्रामरपेक्षा मराठी व्याकरण आधी समजून घ्यावं लागणार आहे. कां ते तुमच्या लक्षात येईलच.

6. मला बोलायला किती वेळ लागेल ?

उत्तर – या प्रश्नाचं उत्तर बरंचसं तुमच्यावर अवलंबून आहे. ज्या स्टेप्स मी या कोर्स मध्ये सांगितल्या आहेत, त्या सर्व तुम्ही आत्मसात केल्या व त्यांचा वापर केला कि लगेच तुम्ही बोलू श्काल. ह्रा 4 स्टेप्स व्यवस्थित वापरण्यासाठी तुम्ही किती दिवस घ्याल ? साधारणपणे 100 दिवसांत तुम्ही व्यवस्थित बोलू शकाल. इंग्लिशमध्ये बोलायची सुरुवात तर तुमची 1 महिन्यातच होईल.